पुणे, ता. १५ डिसेंबर:- रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रेसर कोहिनूर ग्रुपच्या वतीने नुकतेच `कोहिनूर कनेक्ट ३` या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोहिनूर परिवारातील ११०० हून अधिक सहयोगी सदस्यांच्या साक्षीने यावेळी समूहाची आजवरच्या वाटचालीचे सिंहावलोन करतानाच भविष्यातील महत्त्वाकांक्षी योजनांची माहिती समूहाच्या नेतृत्वाकडून सर्वांना देण्यात आली.
याप्रसंगी, कोहिनूर समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. कृष्णकुमार गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक श्री. विनीत गोयल व श्री. राजेश गोयल यांची विशेष उपस्थिती होती. द वेस्टिन हॉटेल येथे आयोजित या भव्य आणि आगळ्या स्नेहमेळाव्यात भारताची देश म्हणून सुरु असणारी विकासाकडील वाटचाल आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कोहिनूर ग्रुप घेत असलेली भरारी यांवर विशेष सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी, कोहिनूर समूहासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ६३ भागीदारांना मानाचा एक्सलन्स अवार्ड तर इतरांना सहयोगीत्वाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कोहिनूर ग्रुपचे संचालक (मार्केटिंग) श्री. समीर देसाई यांनी भारताच्या आणि कोहिनूर समूहाच्या विकासयात्रेतील टप्पे आपल्या आगळ्या सादरीकरणातून उलगडून दाखविले. श्री. कृष्णकुमार गोयल आणि श्री. विनीत गोयल यांनी आपल्या ओघवत्या शैलीत, उद्योगामध्ये परस्परांना प्रगतीची समान संधी देणाऱ्या सहयोग तत्वाचे महत्त्व अधोरेखित केले, तसेच समूहाशी संलग्नित सर्वांनी आजवर दिलेल्या मोलाच्या आणि अभिमानास्पद योगदानाचे विशेष कौतुक केले. समूह आणि त्याच्याशी संलग्न अशा सर्व घटकांमधील संबंध आणखी दृढ करणारा हा कार्यक्रम कोहिनूर समूहाच्या आगामी वाटचालीची दिशा दाखवणारा ठरला. परस्परविश्वास आणि स्नेहभाव या तत्वांवर आमचे आमच्या भागीदारांशी असणारे नाते जुळले, फुलले आणि आता ते बहरते आहे. कोहिनूर कनेक्ट ३.० सारख्या कार्यक्रमातून त्याचेच दर्शन घडते, असे प्रतिपादन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. कृष्णकुमार गोयल यांनी केले. आमच्या आजवरच्या वाटचालीत आमच्या या सहयोगी भागीदारांचा खूप मोठा वाटा आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत सह व्यवस्थापकीय संचालक श्री विनीत गोयल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोहिनूर ग्रुप- कोहिनूर ग्रुप हा पुण्यातील बांधकाम म्हणजेच रिअल इस्टेट क्षेत्रातील एक आघाडीचा समूह आहे. गेल्या चार दशकांमध्ये पुण्याच्या नागरी विकासाबरोबरच समूहाचाही कार्यविस्तार वाढत गेला. समूहाने आजवर ४५ हून अधिक प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले असून १८ हून अधिक प्रकल्प सध्या निर्मानाधिन आहेत. आजवर सुमारे ९० लाख चौ.फू. इतके निर्माण समूहाने केले असून त्यातून सुमारे १० हजार सुखी कुटुंबांशी आपलं नातं जोडलं आहे. बांधकाम क्षेत्रात, गुणवत्ता आणि नावीन्य या दोन प्रमुख सूत्रांच्या आधारे कोहिनूर ग्रुप आपली दिखामदार वाटचाल करीत आहे.
पत्ता- कोहिनूर ग्रुप
कोहिनूर डेव्हलपमेंट कार्पोरेशन, ए-१०१/१०२, आयसीसी ट्रेड टॉवर, सेनापती बापट रोड, पुणे – ४११०१६
दूरध्वनी- ०२० ६७६४१८३९ www.kohinoorpune.com