कोहिनूर ग्रुप’तर्फे आयोजित कार्यक्रमात कपिल देव यांनी साधला उपस्थितांशी संवाद
पुणे, जानेवारी २०२३:- पुणे, जानेवारी २०२३ : “ आयुष्यात जे घडत आहे तो प्रत्येक क्षण मनापासून अनुभवा. वर्तमानात जगा, स्वतःवर प्रेम करा आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, हाच जीवनात आनंदी राहण्याचा, 'सदा सुखी' राहण्याच्या मंत्र असल्याचे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले.
बांधकाम क्षेत्रात गेली ४० वर्षे कार्यरत असलेल्या कोहीनूर ग्रुप’तर्फे नुकतेच सेनापती बापट रस्ता येथील हॉटेल जे डब्लू मेरीएट याठिकाणी आयोजित कार्यक्रमात कपिल देव बोलत होते. यावेळी ग्रुप’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल, सह-व्यवस्थापकीय संचालक विनीत गोयल व राजेश गोयल, संचालक रघु अय्यर हे उपस्थित होते. प्रसिद्ध क्रीडा निवेदिका रीधिमा पाठक यांनी कपिल देव यांच्याशी संवाद साधला.
कार्यक्रमात कपिल देव व कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते कोहिनूर ग्रुप’च्या वाकड येथील ' कोहिनूर वेस्ट व्ह्यू रिझर्व - न्यू वाकड’ या नवीन राहिवासी प्रकल्पाचे अनावरण करण्यात आले.
कपिल देव म्हणाले, " आपल्या आसपास पहिले, तर अनेक जण एखादा क्षण अनुभविण्याऐवजी मोबाईलमध्ये फोटो काढण्यात व्यस्त असतात. तर काही जण मला एखादी गोष्ट जमेल की नाही, मी किती कमनशिबी आहे, हा विचार करून त्रस्त, दुःखी होतात. मात्र तसे ना करता, आहे तो प्रत्येक क्षण मनापासून जगा, स्वत: साठी जगा आणि यश मिळवण्यासाठी मनापासून मेहनत करा."
कृष्णकुमार गोयल म्हणाले. “ कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९८३ साली विश्वचषक जिंकला, योगायोग म्हणजे त्याच साली कोहिनूर ग्रुप’ची देखील सुरुवात झाली आहे. या दोन्ही प्रसंगांना आता ४० वर्षे पूर्ण होत आहे. कोहिनूर’चा या ४० वर्षांतील प्रवास अविस्मरणीय होता. या दरम्यान एका महत्वाची गोष्ट आम्ही शिकलो, ते म्हणजे व्यवसायात प्रामाणिकपणा राखणे आणि नवीन बदलाचा स्वीकार करत, ते आत्मसात करणे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल होता तो तंत्रज्ञानाचा. यापुढेही ग्रुप’ची वाटचाल एका नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. पुढील काळात पुण्याच्या चाहूबाजूना कोहिनूर ग्रुप आपले प्रकल्प उभारणार आहे. ’’
निसर्ग ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून विकसित करण्यात आलेल्या या प्रकल्पात २० हून अधिक सोयी- सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तब्बल ९.५ एकर परिसरात हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यामध्ये २२ मजल्यांचे ६ टॉवर्स असून. २ व ३ बीएचके स्वरूपातील १००० हून अधिक घरे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रकल्पातील एकूण जागेपैकी ६० ते ७० टक्के जागा ही ‘ओपन स्पेसेस’ प्रकारातील आहे. विविध प्रकारची झाडे, पक्ष्यांचा अधिवास अशा नैसर्गिक घटकांनी संपन्न अशा या प्रकल्पात मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र जागा आणि बाग यांचा देखील समावेश आहे. करमणूकीच्या विविध सुविधांचाही अंतर्भाव या प्रकल्पात करण्यात आला आहे. ताथवडे, मारुंजी व वाकड या परीसरांच्या केंद्रस्थानी असलेल्या या प्रकल्पात नागरिकांसाठी सर्व सोयी सुविधांनी सज्ज आणि मोठ्या स्वरूपातील घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.